Moshi : फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

Harassment of a married woman demanding money from Maher to pay off a flat loan

एमपीसी न्यूज – फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे देण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याबाबत विवाहितेचा पती आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मोशी येथील गायकवाड वस्तीमध्ये घडला आहे.

सुनील श्रीधर पंचाळ (वय 39, रा. गायकवाड वस्ती, मोशी टोल नाका), लतिका राकेश सुतार (वय 37, रा. विश्रांतवाडी पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ऑक्टोबर 2019 ते जुलै 2020 या कालावधीत घडली. फिर्यादी महिलेचे आरोपी पती सुनील पांचाळ याच्यासोबत जून 2019 मध्ये लग्न झाले.

लग्न झाल्यानंतर चार महिन्यांनी आरोपींनी विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली.

विवाहितेकडे फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून एक लाख तीस हजार रुपये आणण्याची मागणी केली. एवढे पैसे विवाहितेच्या माहेरची मंडळी देऊ शकले नाही.

त्यामुळे आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ आणि मारहाण करत मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.