Moshi Crime : इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – सस्ते पाटील नगर, मोशी येथे इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या एका गावठी दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. यात दोघांवर कारवाई करत पोलिसांनी सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भीमा लिंबा राजपूत (वय 40), अर्जुन लिंबा राजपूत (वय 35, दोघे रा. तुपेवस्ती, मोशी) यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी परिसरातील सस्ते पाटील नगर, मोशी येथे इंद्रायणी नदीकाठी अवैध गावठी दारूभट्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या दारूभट्टीवर छापा मारून दोघांना ताब्यात घेतले.

या छाप्यामध्ये साडेपाच लाखांचे साडेनऊ हजार कच्चे रसायन, 25 हजार 200 रुपयांची 420 लिटर तयार दारू, 9 हजारांचे लाकडी सरपण, आठ हजारांची पाण्याची मोटर, पाच हजारांची जर्मलची जाळी, एक हजार 160 रुपयांचे पाईप असा एकूण पाच लाख 98 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक निरीक्षक अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, अमोल शिंदे, गणेश करोटे, मारुती करचुंडे, योगेश तिडके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.