Moshi : कीर्तन ऐकत झोपी गेलेल्या तरुणाचे दोन मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – मोबाईलवर कीर्तन ऐकत-ऐकत झोपी गेलेल्या तरुणाचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 3 जून रोजी बोराटेवस्ती मोशी येथे उघडकीस आली.

नितीन संजय कुरकुटे (वय 25, रा. बोराटे वस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. 2 जून रोजी रात्री त्यांनी मोबाईलवर कीर्तन लावले. नितीन आणि त्यांचा मित्र दोघेजण कीर्तन ऐकत होते. कीर्तन ऐकत-ऐकत दिवसभराच्या कामामुळे त्यांना झोप लागली. त्यांच्या उशाजवळ ठेवलेले 9 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी रात्री चोरून नेले.

3 जून रोजी पहाटे नितीन उठले असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.