Pune : मुंबई-पुणे मागार्वर धावणाऱ्या डेक्कन क्वीनसह काही एक्सप्रेस रेल्वे गाड्या उद्यापर्यंत रद्द

एमपीसी न्यूज – पाण्याखाली गेलेले रूळ, ठिकठिकाणी कोसळणाऱ्या दरडी आदी कारणांमुळे रेल्वे प्रशासनाने मुंबई-पुणे मागार्वर धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या सोमवार (दि.२९) पर्यंत रद्द केल्या आहेत. यामध्ये (12224) पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, (17613) पनवेल नांदेड एक्सप्रेस, (17031) मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस आणि पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

कोकण भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रूळ दिसेनासे झाले आहेत. तसेच अनेक डोंगर, घाट मार्गावर दरड कोसळत असल्याने रेल्वे प्रशासनाने मुंबई-पुणे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या उद्या सोमवार (दि. २९) पर्यंत रद्द केल्याचे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.