MP Shrirang Barne : शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा खासदार बारणे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनेक आजी-माजी पदाधिकारी यांनी उपनेते व महासंसदरत्न (MP Shrirang Barne) खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत व राजेश वाबळे यांच्या पुढाकाराने आज (रविवारी) शिवबंधन बांधून बाळासाहेबांच्या शिवसेनेत बहुसंख्येने प्रवेश केला.

यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे शरद हुलावळे मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर युवासेना चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप , पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके, राजेंद्र तरस निलेश तरस व इतर आजी-माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी प्राध्यापक दत्तात्रेय भालेराव सर (मोरवाडी), अनिकेत पाटील अध्यक्ष विद्यार्थी संघटना डी वाय पाटील मोहन चौधरी, वाडीलाल व्यापारी संघटना संत तुकाराम नगर नरेश ठाकूर , अध्यक्ष ईगल स्पोर्ट क्लब सुनीता बांबळे, अध्यक्ष आराधना महिला बचत गट माधुरी ताटकर, सचिव आराधना महिला बचत गट, रुपेश चांदेरे शिवसेना संघटक, शाखाप्रमुख नरेश टेकाडे, विभाग प्रमुख शिवसेना प्रीतम बोत्रे, सामाजिक कार्यकर्ते अमित गुंजाळ , दीपक जाधव, उपाध्यक्ष आराधना महिला बचत गट जरीना सिद्दिकी वरील मान्यवरांचा शिवसेना उपनेते व महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला.

Pimpri news : शिवसेनेला धक्का! कामगार नेते इरफान सय्यद यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

खासदार बारणे म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झपाट्याने विकास सुरू आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शहरात मोठे संघटन केले जाणार आहे.(MP Shrirang Barne) आगामी महापालिका निवडणुकीला बाळासाहेबांची शिवसेना मोठ्या आत्मविश्वासाने, आक्रमकतेने सामोरे जाणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.