Chikhali crime : पती समोर लग्नाची मागणी करत पतीलाच मारहाण

एमपीसी न्यूज – पतीसोबत जात असलेल्या विवाहितेला एका तरुणाने रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घातली. तसेच महिलेच्या पतीला मारहाण(Chikhali crime) करून गंभीर दुखापत केली. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी चिखली येथे घडली.

धर्मराज संतोष पवार (वय 25, रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MP Shrirang Barne : शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या पतीसोबत शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चिखली रोडने पायी चालत जात होती. त्यावेळी आरोपीने त्यांना अडवले. तू मला आवडतेस.(Chikhali crime) माझ्याशी लग्न कर. पतीला सोडून दे. नाहीतर काय होईल बघ, अशी आरोपीने धमकी दिली. विवाहितेचा विनयभंग करून आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.