Pimpri news : शिवसेनेला धक्का! कामगार नेते इरफान सय्यद यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का बसला आहे. राज्याच्या कामगार सल्लगार समितीचे सदस्य, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी आज (रविवारी) बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सय्यद यांचे स्वागत केले. (Pimpri news) त्यांच्याकडे उपनेतेपदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाणे येथील टेंभी नाका आनंदाश्रम येथे हा सोहळा पार पडला.

शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे. यापूर्वी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.आता त्यांच्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यात असंघटित कामगारांचे मोठे नेटवर्क, तरुणांमध्ये क्रेझ असलेले कामगार नेते इरफान सय्यद यांनीही बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सय्यद हे असंघटित कामगारांचे नेते आहेत. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे कामगारांचे मोठे जाळे आहे. त्यांनी मोठा कामगार वर्ग जोडून ठेवला आहे. उत्तम संघटन कौशल्याच्या जोरावर कार्यकर्ते, कामगार वर्गाची मोठी फळी त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Chikhali crime : पती समोर लग्नाची मागणी करत पतीलाच मारहाण

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरफान सय्यद यांचे स्वागत केले. त्यांच्यावर उपनेतेपदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली.(Pimpri news) बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून सय्यद यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.