MPC News Special : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात 19 टक्क्यांनी वाढ

उत्पादन शुल्क विभागाकडून दोन हजार 224 कोटींचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरस (MPC News Special ) कामगिरी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात एक हजार 855.82 कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा केला. तर सन 2022-23 या आर्थिक वर्षात दोन हजार 224.82 कोटी रुपयांचा महसूल जमा केला. मागील वर्षीच्या तुलनेत विभागाने 19 टक्के अधिक म्हणजेच 369 कोटींचा अधिक महसूल जमा केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री तसेच परराज्यातील मद्याच्या वाहतुकीविरुद्ध नियमितपणे विशेष मोहिमा राबविल्या जातात. एक एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत दोन हजार 169 गुन्हे दाखल करून त्यात दोन हजार 227 आरोपींना अटक केली. वर्षभरात 10 कोटी 26 लाख 90 हजार 676 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर एक एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत दोन हजार 658 गुन्हे दाखल करून दोन हजार 947 आरोपींना अटक करत 18 कोटी 14 लाख 19 हजार 177 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Pimpri News : महापालिकेतर्फे शुक्रवारी महारोजगार मेळावा

गोवा राज्यातून अवैधरित्या उत्पादन शुल्क चुकवून महाराष्ट्रात मद्य तस्करी केल्याप्रकरणी सन 2021-22 मध्ये चार गुन्हे दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून तीन वाहने जप्त करत एक कोटी चार लाख 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर सन 2022-23 मध्ये 21 गुन्हे दाखल करत 42 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये आठ कोटी 64 लाख 45 हजार 169 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्षभरात 19 वाहने देखील जप्त केली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 727 टक्के अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध ढाबा, सार्वजनिक गुत्ता यामध्ये मद्य सेवन प्रकरणी सन 2022-23 मध्ये 134 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातील 61 प्रकरणांमध्ये 229 आरोपींना न्यायालयाने आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींकडून तीन लाख 96 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशा प्रकारची एकही कारवाई सन 2021-22 मध्ये झालेली नव्हती.

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध वेळोवेळी व नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे. त्या परिणामस्वरूप मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी महसुलात 369 कोटींची वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या कारवाया पुढील काळात देखील नियमितपणे सुरु राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सी बी राजपूत यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात मद्य विक्रीत वाढ
पुणे जिल्ह्यात सन 2021-22 पेक्षा सन 2022-23 मध्ये देशी मद्य विक्रीत 15 टक्के (MPC News Special ) वाढ झाली आहे. तर विदेशी मद्य विक्रीत 23 टक्के वाढ झाली आहे. बिअर मद्य विक्रीत 51 टक्क्यांनी तर वाईन विक्रीमध्ये 31 टक्के वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.