MPSC Result : महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Result) महाराष्ट्र कृषि सेवा अंतर्गत पदांची भरती करण्यासाठी भरती कार्यक्रम राबविण्यात आला. या परीक्षेचा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली.

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा – 2021 च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या 626 उमेदवारांच्या मुलाखती यशदा, पुणे येथे 10 ते 13 एप्रिल 2023 या चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.

Pimpri : बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण (MPSC Result)  गुणवत्ता यादी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ व गट-ब संवर्गातील नियुक्तीसाठी 203 उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.