BNR-HDR-TOP-Mobile

Mumbai : कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

कोंढवा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज- पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोंढवा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3