Kudalwadi : कुदळवाडीतील पुठ्ठयाच्या गोडाउनला आग

एमपीसी न्यूज – चिखली, कुदळवाडी येथील पुठ्ठयाच्या गोडाउनला आज (शनिवारी) दुपारी सव्वाएकच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराची दुकाने आहे. गोदामे आहेत. कुदळवाडी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पुठ्ठयाच्या गोडाउनला आज अचानक आग लागली. धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

पिंपरीतील तीन, चिखलीमधील पाच, तळवडेमधील पाच, भोसरीतील चार आणि प्राधिकरणातील एक असे 14 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.