Mumbai : संभाजी भिडे गुरुजींना हायकोर्टाचा दिलासा; याचिकेतून नाव वगळण्याचे कोर्टाचे आदेश

एमपीसी न्यूज : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी (Mumbai ) यांचे नाव जनहित याचिकेतून वगळावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी युक्रांत संघटनेचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र त्यांचे नाव जनहित याचिकेतून वगळण्याचे आदेश न्यायालयाने घेतल्याने कुमार सप्तर्षी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे सर्वत्र आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी त्यांच्यावर तक्रार देखील दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या अमरावती पोलिस करत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.

आता उच्च न्यायालयाने या बाबत मात्र सध्या तरी भिडे गुरुजीना (Mumbai) दिलासा दिला आहे. न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला निर्देश देताना म्हंटले, की वादग्रस्त वक्तव्य केल्याचे अनेक प्रकरणे आजवर घडली आहेत,. परंतु, केवळ भिडे गुरुजींचेच नाव याचिकेत का? त्यामुळे जनहित याचिका केवळ एका व्यक्ती विरोधात दाखल करता येत नाही. त्यामुळे भिडे गुरुजींचे नाव यातून वगळावे.

Alandi : एका खड्ड्याने नागरिक हैराण; अखेर केली खड्ड्याचीच पूजा

तर तुम्हाला जो निर्णय द्यायचा तो द्या आम्ही हे प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात न्यायचं का ते ठरवू, असं याचिकाकर्त्यांच्या वकीलांकडून कोर्टात सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.