Alandi : एका खड्ड्याने नागरिक हैराण; अखेर केली खड्ड्याचीच पूजा

एमपीसी न्यूज : आळंदीत भर रस्त्यातील (Alandi) एका खड्ड्याने नागरिकांना हैराण केले आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज या खड्ड्याची चक्क पूजा करण्यात आली आहे. 

आळंदी हवेली विभागातील पुणे आळंदी रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून त्याचा वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच पावसाळ्या दरम्यान येथील खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. त्या खड्ड्यात पाणी साचल्याने रहदारी करणाऱ्या वाहन चालकांना त्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने काही वाहनांचा अपघात होत आहे. आजही एका वाहन चालकाच्या गाडीला अपघात झाला.

Hinjawadi : रहदारी वाढल्याने हिंजवडी येथील वाहतुकीत बदल

या घटनेचा आढावा दादासाहेब करांडे यांनी घेतला. संबंधित प्रशासनाचे (Alandi) त्या खड्डयाकडे दुर्लक्ष असल्याने त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेथील खड्ड्याची आज हार, फुले वाहवून पूजा केली. या पूजेमुळे हा खड्डा चर्चेचा विषय बनला असून आता यामुळे तरी प्रशासनाचे लक्ष केंद्रित होत आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.