Mumbai : आता घरीच बनवा मास्क; केंद्राकडून मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – ‘कोविड 19’च्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सच्या खरेदीत वाढ झाली. त्यामुळे चेहऱ्यावरचा मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सची बाजारात कमतरता निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी, केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने घरी मास्क बनवण्याविषयी पुस्तिका जारी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी फेस मास्क वापरावा, अशी मागणी दुकाने आणि सेवांकडून केली जात आहे. काही दुकानांमध्ये गिऱ्हाईकांनी मास्क न वापरल्यामुळे त्यांना सेवा नाकारण्यात आली. अनेक आरोग्य तज्ञ देखील सार्वजनिक ठिकाणी फेस मास्कचा वापर करण्याची सूचना करत आहेत. जेणेकरून कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होईल. विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या भागात राहणा-या लोकांना मास्क घालण्याची खास शिफारस करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने घरीच मास्क बनवण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीना स्वतः मास्क बनवण्यासाठी माहिती देण्यात आली असून, मास्क तयार करणे, वापरणे आणि त्याचा पुन्हा उपयोग कसा करावा, याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. याद्वारे देशभरात मोठ्या प्रमाणात मास्कच्या वापराला चालना मिळेल. हे मास्क बनवण्यासाठी आवश्यक सामुग्रीची सहज उपलब्धता, घरी बनवण्यास सोपे आणि वापरायला सुटसुटीत आणि पुनर्वापर हे प्रमुख निकष आहेत.

घरी बनवण्यात आलेल्या मास्कचा सार्वत्रिक वापरामुळे एन-95 आणि एन-99 मास्कची मागणी कमी होण्याची शक्यता आहे, जे प्रामुख्याने कोविड 19 शी लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरण्यासाठी आहेत.

पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
tinyurl.com/wcev2pa

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.