Mumbai: राज्यात आणखी सहा पॉझिटीव्ह, कोरोनाबाधितांची संख्या 122!

0

एमपीसी न्यूज – राज्यात दुपारी आणखी सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 झाली आहे. या नवीन रुग्णांपैकी पाचजण मुंबईत तर एकजण ठाण्यातील आहे. 

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. राज्यात कालअखेर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 107 होती.

त्यात आज 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सकाळी सांगली जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. मुंबईत सकाळी चार व दुपारी पाच असे एकूण नऊ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ठाणे येथील एका रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 122 वर जाऊन पोहचला आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like