Mumbai News : राष्ट्रवादीने स्थापन केला ‘एलजीबीटी’ सेल, राज्यप्रमुखपदी प्रिया पाटील

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसनं आज देशातील पहिल्या ‘एलजीबीटी सेलची’ स्थापना केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एलजीबीटी सेलच्या कार्यकारिणीची घोषणा केली. या सेलच्या राज्य अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

राष्ट्रवादीने देशात पहिल्यांदा युवती संघटनेचा प्रयोग केला आणि आता ‘एलजीबीटी सेल’ स्थापन करुन या वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,” असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे चौघेजण प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एलजीबीटी वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यातून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, शिवाय आम्ही निवडणूक काळात जाहीरनाम्यात जे काही जाहीर केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याने युवती संघटना स्थापन केली आणि आता ‘एलजीबीटी’ सेलची स्थापना करत आहे. देशातील असा पहिला पक्ष आहे.

जो भाषणापुरता नाही, तर कृती करणारा पक्ष आहे. मिशन मोडमध्ये वेल्फेअर बोर्ड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सेलची इतर कार्यकारिणी उपाध्यक्ष अनिता वाडेकर, जनरल सेक्रेटरी माधुरी सरोदे शर्मा, स्नेहल कांबळे, सेक्रेटरी उर्मी जाधव, सुबोध कासारे, कोषाध्यक्ष सावियो मास्करीनास, सदस्य अभिजित ठाकूर, प्रियुष दळवी, श्रेयांक आजमेरा, साहिल शेख, साध्य पवार, रोहन पुजारी, दिव्या लक्ष्मनन आदी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.