Chinchwad News : अजितदादांमुळेच मी खासदार होऊ शकलो – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – अजित पवार यांच्यामुळेच आपण खासदार होऊ (Chinchwad News) शकलो. पक्षप्रवेश, उमेदवारी या गोष्टी त्यांनी मोठ्या साहेबांच्या माध्यमातून करवून घेतल्या, असे शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच जाहीर कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या होत्या. त्या संदर्भातील चिंचवड येथील मुलखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नावर खुलासा करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, हे विधान अजित पवार की जयंत पाटील असे तुलनात्मक पातळीवर नव्हते. त्यामागे स्थानिक संदर्भ होते.

Pune : जमिनीचे पैसे  मालकाला न देता सव्वासात लाखांची फसवणूक

अजित पवार यांच्यामुळेच आपण खासदार होऊ शकलो. पक्षप्रवेश, उमेदवारी या गोष्टी त्यांनी मोठ्या साहेबांच्या माध्यमातून करवून घेतल्या. अजितदादांचे पुत्र मावळ लोकसभा निवडणूक लढवत असतानाही तितकेच लक्ष अजितदादांनी शिरूरमध्ये दिले. त्यामुळेच अवघ्या 22 दिवसांच्या प्रचारात निवडणूक जिंकणे शक्य झाले.

लोकप्रिय चेहरा असला तरी अजितदादांचे भक्कम पाठबळ लाभले म्हणूच निवडणूक जिंकता आली, असे ते म्हणाले. अजितदादांनी नियोजनबद्ध पुणे, पिंपरी-चिंचवड शहर वसवले. पुणे जिल्हा हा मेडिकल टुरिझम व्हावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वढू तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी 250 कोटी रुपये उपलब्ध करून देणारे अजितदादा हे (Chinchwad News) पहिले राजकीय नेते आहेत, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.