Pune Crime News: भरदिवसा गोळ्या घालून बिल्डरचा खून

एमपीसी न्यूज – पुण्यात भर दिवसा एका बांधकाम व्यावसायिकाची अज्ञातांकडून गोळीबार करुन हत्या करण्यात आली. पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेट बँक स्ट्रेजरी शाखेजवळ पदपथावर आज, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

राजेश हरिदास कानाबार ( वय -४५, रा. घोरपडी ) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत राजेश यांचे जागेवरून काही व्यक्तींसोबत वाद सुरू होते. त्यातूनच हा प्रकार झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजेश हे एसबीआय समोरील फुटपाथवर उभे होते.

यावेळी याठिकाणी मोटर सायकल वरून दोघेजण आले. त्यातील एकाने राजेश यांच्यावर गोळी झाडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजेश यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळतात जवळच असणाऱ्या बंडगार्डन पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.