Pune News: संपूर्ण शहरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार त्वरित थांबवावा- राघवेंद्र मानकर 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दरदिवशी अधिकाधिक करोना रुग्णांची भर पडत आहे अशातच रेमडेसिव्हिर हे उपचारात महत्वाचे औषध असल्याने त्याची उपलब्धता सुरळीत होणे अपेक्षित आहे. पण, पुणे शहरात या औषधांचा तुटवडा भासत असून यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हे औषध उपलब्ध करून देण्यात यावे. काळाबाजार थांबवावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तीव्र स्वरूपात आंदोलन करेल, असा इशारा युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी दिला आहे.

या औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी आज अन्न व औषध प्रशासन आयुक्त कार्यलयात भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्या वेळी मानकर बोलत होते.

राघवेंद्र मानकर म्हणाले, या औषधाचा पुरवठा चार कंपन्या करतात. त्यामध्ये कॅडेलाची किंमत 2800 रुपये, सिपलाची किंमत 4000 रुपये, ज्यूबिलटची किंमत 4700 रुपये, हेटरोची किंमत 5400 रुपये, अशी आहे. मात्र, या संकट काळात एकच समान किंमत सर्वसामान्यांना परवडेल, अशी माफक किंमत होणे अपेक्षित आहे.

या आंदोलनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा बापट या ही उपस्थित होत्या. त्यांनीही  प्रशासनाला धारेवर धरले. त्या म्हणाल्या, हेटरो कंपनी दररोज 30000 लशी पुणे जिल्ह्यात पाठवते, तिथून हे औषध इतर ठिकाणी चढ्या किमतीने विकले जाते हे दुर्दैवी आहे.  त्यामुळे प्रशासनाने हे औषध सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा किमतीत विकण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना द्यावे.

या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतीक देसरडा, निहाल घोडके, अभिजित राऊत, अक्षय वायाळ, अरविंद गोरे यांनी केले. या आंदोलनाला अमित कंक, अपूर्व खाडे, दुष्यांत मोहोळ, राहुल दळवी, प्रमोद कोंढरे, छगन बुलाखे, राजेंद्र काकडे, राजू परदेशी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.