Mumbai : सलमान चक्क ‘सॅनिटायझर’ विकणार ?

Salman to sell 'sanitizer'?

एमपीसीन्यूज : करोनाच्या संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा कोण कसा फायदा घेईल, याचा काहीही नेम नाही. भाईजान सलमान खान सध्या लॉकडाऊनमध्ये आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास आहे. तेथे त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस, लुलीया वंतुर अशा अभिनेत्री देखील आहेत.  नुकतेच त्याने आपले एक युट्यूब चॅनल सुरु करुन प्रेक्षकांना चकित केले होते.  आता तर तो चक्क सॅनिटायझरची विक्री करणार आहे.

या लॉकडाऊनमध्ये  सलमानचे काम जोरात सुरु आहे.  सलमानने ‘फ्रेश’ (FRSH) या नावाची एक कंपनी सुरु केली आहे. या कंपनीचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौदर्य प्रसाधने असे अनेक प्रॉडक्ट लवकरच बाजारात येतील.

परंतु, सध्याच्या करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सलमान केवळ सॅनिटायझरची विक्री करत आहे. या कंपनी बाबत अधिक माहिती देण्यासाठी सलमानने एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

सलमान सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. अलीकडेच त्याची दोन गाणी सोशल मीडियावर प्रदर्शित झाली होती. या गाण्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

या पार्श्वभूमीवर सलमानच्या फ्रेश कंपनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यावर चाहत्यांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.