Mumbai : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट ; सातवा वेतन आयोग लागू

एमपीसी न्यूज- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून या संबंधीचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट मिळाली असून त्यांच्या पगारामध्ये चार हजार ते 14 हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन मासिक चार ते पाच हजार रुपयांनी, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन पाच ते आठ हजार रुपयांनी तसेच प्रथम व द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन नऊ ते 14 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2018 पासून लागू होणार आहे परंतु 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पगारात वाढ होणार आहे. तसेच 1 जानेवारी 2016 पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.