Mumbai : एसटीचा प्रवास देखील कॅशलेस होणार !

एमपीसी न्यूज- मुंबईतील लोकलच्या प्रवासाप्रमाणेच आता एसटीचे स्मार्ट कार्ड येणार असून एसटीचा प्रवास देखील कॅशलेस होणार आहे. मुंबईत शनिवारी (दि. 1) एसटीचा 71 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली.

या स्मार्ट कार्डची किंमत 50 रुपये असून सुरुवातीला ३०० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत पाच हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा मित्र एसटीमधून हे कार्ड स्वाइप करून प्रवास करू शकतील. एसटी प्रवासाशिवाय शॉपिंगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.

त्याचप्रमाणे लवकरच एसटीच्या सर्व गाड्या एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) वर चालविण्यात येतील, असेही मंत्री रावते यांनी सांगितले. यामुळे एसटीची सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होईल. मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.