Pimpri : कॅबिनेटमंत्रीपदी रामविलास पासवान यांच्या निवडीबद्दल मिठाई वाटप

एमपीसी न्यूज – केंद्रीय कॅबिनेटमंत्रीपदी रामविलास पासवान यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पिंपरीमध्ये मिठाई वाटप करण्यात आले. पासवान यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

पिंपरीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक गिरणे, प्रदेश सचिव धुराजी शिंदे, प्रदेश युवा सचिव सचिन जाधव, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष शिवाजी झोडगे, बंजारा प्रकोष्ठ महाराष्ट्र राजकुमार चव्हाण, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सचिन भेंडे, शहर उपाध्यक्ष नवनाथ धोत्रे, गिरीश सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अल्पसंख्याक विभाग लोकजनशक्ती पार्टी अध्यक्ष नसीम शेख यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.