Mumbai: सरकार टिकवण्यासाठी काढला तोडगा! मुख्यमंत्री ठाकरे होणार ‘राज्यपाल कोट्या’तून आमदार!

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अथवा विधानपरिषद सदस्य होणे आवश्यक असल्याने त्यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेत पाठविण्याचा तोडगा काढण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे विधानपरिषद निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे पेच निर्माण झाला होता. या नव्या तोडग्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नावाची राज्यपाल कोट्यातून शिफारस करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मुख्यमंत्री मुद्दाम उपस्थित राहिले नाहीत.

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा सध्या रिक्त आहेत. त्यातील एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिफारस केली गेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर ओढावलेले मोठे संकट तूर्त टळले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.