23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Eknath Shinde Update : शिंदेसेना वि. शिवसेना संघर्ष सुरूच! एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सत्तासंघर्ष संपण्याचे नाव घेईना. शिवसेना नेमकी कोणाची यावर उलट- सूलट चर्चा सुरू असताना शिवसैनिकांमध्येच ‘शिंदेसेना’ आणि ‘शिवसेना’ असे दोन गट पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या एकूण अस्तित्वावर पडलेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर “हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित….” असे म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांनी काल (दि. 25 जून) शिवसैनिकांना उद्देशून सोशल मिडीयावरून आपली भूमिका आणखी स्पष्ट केली आहे. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) आणि इतर शिवसेना आमदार, खासदार, अपक्ष नेते यांनी बंड पुकारून संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरले आहे. गुवाहटीला मुक्कामी असणारे सगळे बंडखोर नेते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने शिवसेनेत बैठकांचे सत्र सुरू झाले आहेत. राज्यातला शिवसैनिक सुद्धा आक्रमक भूमिकेत पुन्हा दिसू लागला असून प्रत्येक जिल्ह्यामधून बंडखोरांविरूद्ध निषेध नोंदवत त्यांनी तोडफोड सत्र सुरू केले आहे.

Combing Operation : वाकड पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन, दोन सराईत आरोपी अटकेत

दरम्यान, या संपुर्ण पार्श्वभूमीवर शिंदे गटाची नेमकी भूमिका कोणती हे स्पष्ट करण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांनी आज ट्विट केले आहे. ट्विटमध्ये शिंदे लिहितात, “प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे.”

गेल्या काही दिवसांपासून केवळ सोशल मिडीयाच्या माध्यमातून वारंवार संवाद साधणारे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना यावेळी महाविकास आघाडीविषयीच अलर्ट दिला आहे. दरम्यान, दिवसेंदिवस शिंदेसेना वि. शिवसेना संघर्ष गडद होत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे शिवसैनिक नेमकं कोणाच्या बाजूने कौल देणार हे यावेळी पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

spot_img
Latest news