Youth Murder Case :  मानेवर वार करून तरुणाचा खून; कडाचीवाडी येथील धक्कादायक प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – चाकण – शिक्रापूर रस्त्यावर सुकल्या डोंगराच्या पायथ्याशी कडाचीवाडी ( ता. खेड ) गावाच्या जवळील वन विभागाच्या हद्दीत एका इसमाचा (Youth Murder Case)  धारदार हत्यारांनी मानेवर वार करून खून करण्याची आल्याची घटना उघडकीस आली आहे. या भागातून शनिवारी (दि.25 जून) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सर्वप्रथम हा मृतदेह पाहिल्यानंतर हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

शशिकांत शिवाजी काशीद ( वय 34 वर्ष , सध्या रा. मातोश्री पार्क, चाकण-शिक्रापूर रोड, रासे , मूळ रा. संगमनेर, जि. अहमदनगर ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या बाबत खून झालेले शशिकांत यांचा भाऊ प्रशांत शिवाजी काशीद (सध्या रा. मातोश्री पार्क, चाकण-शिक्रापूर रोड, रासे , मूळ रा. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली असून त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकण- शिक्रापूर रस्त्यावर कडाचीवाडी गावाच्या हद्दीत सुकल्या डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी सकाळी वन विभागाच्या हद्दीतील निर्जन स्थळी दुचाकी जवळ मृतदेह आढळून आला. चाकण पोलिसांना या बाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी परिसराची पाहणी केली.

Eknath Shinde Update : शिंदेसेना वि. शिवसेना संघर्ष सुरूच! एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन

संबंधित मृतदेहाच्या जवळ मिळालेल्या बँकेच्या पासबुकवरून ओळख पटवण्यात आली. शशिकांत काशीद असे या व्यक्तीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. मानेवर वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. खून झालेल्या काशीद यांच्या नातेवाईकांना या बाबतची माहिती देण्यात आली आहे.

काशीद हा चाकण एमआयडीसी मधील महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीत नोकरीस होता. त्याचप्रमाणे पाण्याच्या अॅक्वा मशीन घरोघरी दुरुस्तीची कामे तो करत होता. शुक्रवारी (दि. 24 जून ) रात्री सव्वा नऊ वाजता शिशीकांत काशीद घरातून जेवण करून बाहेर पडला तो पुन्हा घरी परतलाच नाही. त्यानंतर सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

काशीद दुचाकीवर असतानाच त्याच्या मानेवर वार करून त्याला ठार केले असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. खून (Youth Murder Case)  नेमका कुणी व का केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाकण पोलिसांसह फॉरेन्सिक लॅब पथक आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे , गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.