Mumbai : टाटा मोटर्सच्या सामाजिक योजनांचा सात लाख लोकांना लाभ

एमपीसी न्यूज – टाटा समूहाकडून तात्पुरती मलमपट्टी न करता दूरगामी सकारात्मक परिणाम करणा-या योजना राबविण्यात येतात. मागील पाच वर्षात कंपनीने सुमारे 24 लाख लोकांना विविध उपक्रमांमधून लाभान्वित केले आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आरोग्य विषयक काम करताना कंपनीने दुष्काळग्रस्त भागातील 450 ठिकाणी कुपोषण आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याचे प्रकल्प राबवले. हे उपक्रम विशेषतः आदिवासी भागात राबविण्यात आले. याचा सुमारे 3.8 लाख लोकांना फायदा झाला. तर मागील एक वर्षात सात लाख लोकांना लाभान्वित करण्यात आले आहे.

सर्व भागीदारांचे हित व्हावे. कारण हे भागीदारच कंपनीच्या अस्तित्वाचा उद्देश आहेत. असे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे मत होते. त्यानुसार टाटा समूह कार्पोरेट सामाजिक जबाबदारी सांभाळत आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पर्यावरण आदी घटकांमध्ये सक्रियपणे काम करत आहे. राष्ट्र निर्माण संकल्पनेतून टाटा मोटर्सने मागील एक वर्षात सुमारे सात लाख लोकांच्या जीवनात सुधारणा केली आहे. यामध्ये 40 टक्के लाभार्थी अनुसूचित जाती (एस सी) आणि अनुसूचित जमाती (एस टी) समुदायातील आहेत.

शिक्षण क्षेत्रात काम करताना कंपनीने एक लाख उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत केली. टाटा मोटर्स देशातील पहिली कार्पोरेट कंपनी आहे, ज्या कंपनीने अफार्मेटिव्ह ऍक्शन द्वारे आयआयटी मुंबई या संस्थेला आर्थिक सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी देखील कंपनीने भर दिला आहे. कंपनी बेरोजगार तरुणांना ‘कौशल्य’ उपक्रमाअंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवते. मागील वर्षी कंपनीने एक लाख तरुणांना प्रशिक्षित केले. त्यातील 56 हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. तर चार हजार विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. महिला आणि शेतक-यांशी देखील कंपनी विविध उपक्रमातून जोडली गेली आहे.

‘वसुंधरा’ कार्यक्रमांतर्गत कंपनी पर्यावरण विषयक जनजागृती आणि कार्यक्रम राबवते. आजवर कंपनीने 11 लाख वृक्षारोपण केले. 89 हजार लोकांना पर्यावरणाप्रती जागृत केले. विशेषतः या अभियानात लहान मुलांचा सहभाग सर्वाधिक होता. महाराष्ट्र शासनाच्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत टाटा मोटर्सने एकीकृत ग्राम विकास योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील जव्हार मधील पाथर्डी येथील तीन हजार आदिवासी नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. यामध्ये 70 टक्के विकासाची संसाधने शासनाकडून देण्यात आली. टाटा मोटर्सच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये कर्मचा-यांची भूमिका विशेष असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.