Pimpri News : महापालिका राष्ट्रीय रायफल व पिस्तुल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र विकसित करणार  

एमपीसी न्यूज – नवी दिशा योजने अंतर्गत महिला बचत गट / महिला मंडळ यांना शौचालय देखभाल दुरूस्ती करण्यास देणे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय रायफल व (Pimpri News) पिस्तुल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र” विकसित करून ते अरुण पाडुळे स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन यांना 10 वर्षाकरिता प्रशिक्षणाकरिता कराराने चालविण्यास देण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

मौजे वढू बुद्रुक ता.शिरूर जि.पुणे येथील धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज यांचे पुण्यतिथी कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य अदा करणेस, प्रभाग क.2 से.क्र.16 राजे शिवाजी नगर मधील रस्ते अद्यावत पध्दतीने करणे अंतर्गत उर्वरीत विद्युत विषयक कामे करणेस, मौजे चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारक इमारतीच्या सुधारीत बांधकाम परवानगीसाठीचे विकास शुल्क व प्रशमन शुल्क माफ करणेस, केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी येथे घरे बांधणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामे करणेस, बोपखेल गावठाणापासून खडकी बझारपर्यंत होणा-या नियोजित उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा ठरणा-या महापारेषण कंपनीच्या अती उच्च दाब उपस्कर खांब व तारा हलविणे व अनुषंगिक कामे करणेकामी वार्षिक परवाना शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली.

 

Chinchwad News : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिलीप सोनीगरा ज्वेलर्स येथे सोन्यासह चांदी लुटण्याची संधी…

बोपखेल गावठाणापासून खडकी बझारपर्यंत होणा-या नियोजित उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा ठरणा-या महापारेषण कंपनीच्या अती उच्च दाब उपस्कर खांब व तारा हलविणे व अनुषंगिक कामे करणेकामी पर्यवेक्षण शुल्क अदा करणेस, बोपखेल गावठाणापासून खडकी बझारपर्यंत होणा-या नियोजित उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा ठरणा-या महापारेषण कंपनीच्या अती उच्च दाब उपस्कर खांब व तारा हलविणे व अनुषंगिक कामे करणेकामी वार्षिक भाडेपट्टी अदा करणेस, सिटीझन परसेप्शन सर्व्हे 2022 च्या जनजागृतीकामी झालेल्या खर्चास, च-होली टप्पा 1- 21 एम.एल.डी. व टप्पा 2-20 एम.एल.डी. मैलाशुध्दीकरण केंद्राचे चालनास मान्यता देण्यात आली.

देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणेस, मनपाचे प्रभाग क्र.3 च-होली येथील चोविसावाडी येथे अग्निशामक केंद्र बांधणेस, पिंपरी चिंचवड मनपाचे “ब” प्रभागातील जलनि:सारण नलिकांची व चेंबर्सची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणे या कामास, मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (Pimpri News) रुग्णालयातील नियोजित CSSD विभागाकरिता 30 KVA युपीएस खरेदी करणेस, मनपाच्या नविन कै.ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी रुग्णालयाचे अंतर्गंत व बाहय परीसराची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता करणेस, मनपाच्या नविन भोसरी रुग्णालयाचे अंतर्गंत व बाहय परीसराची दैनंदिन साफसफाई व स्वच्छताकरणेस प्रशासक शेखर सिंह यांनी झालेल्या स्थायी समिती सभेच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.