Murder Mystery : सावधान ! जटिल यादव घेतोय एका मर्डरचा शोध…

Be careful! Jatil Yadav is looking for a murder ...

एमपीसी न्यूज – सध्या नवीन चित्रपट वेबमिडियावर रिलिज होत आहेत. चित्रपटगृहे बंद असल्याने हे नवीन माध्यम लोकांनी आपलेसे केले आहे. त्यामुळे सध्या या प्लॅटफॉर्मवर येणा-या चित्रपटांची संख्या वाढती आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या आगामी चित्रपटाचं नाव ‘रात अकेली है’ असं आहे. हा एक क्राईम मिस्ट्री प्रकारातील चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. ‘रात अकेली है’ या चित्रपटाचं कथानक जटिल यादव नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. ही मुख्य व्यक्तिरेखा नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारली आहे. एका नामांकित नेत्याचा खून झाला आहे. या खुनाच्या चौकशीची जबाबदारी जटिल यादववर सोपवण्यात आली आहे. आता हा खून कोणी केला? का केला? खरंच हा खून आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटात शोधणार आहे.

लक्षवेधी कथानक आणि जबरदस्त स्टार कास्ट हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हटलं जात आहे. यामध्ये नवाजसोबत राधिका आपटे, स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धुलिया, पद्मावती राव, शिवानी रघुवंशी असे दर्जेदार कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.