Nagpur : माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

एमपीसी न्यूज- मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (वय 92) यांचे आज, गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास नागपुरातील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.

सर्वसामान्यांच्या कल्याणाची इच्छा बाळगणारा आणि त्यासाठी प्रयत्न करणारा एक सच्चा व समन्वयी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आहे. 2003 साली त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. परंतु, उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज पहाटे दीडच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला होता. त्याच्यावर गांधी विचारांचा खूप मोठा पगडा होता. न्यायाधीशासोबतच ते उत्तम लेखक होते. 1941 मध्ये त्यांनी स्वातंत्र्य सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. त्यांना सुमारे तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.