Talegaon Dabhade : रामदास वाडेकर यांना राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- मावळ तालुका निवेदक संघाचे संस्थापक आणि दैनिक सकाळचे पत्रकार व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ टाकवे संस्थेचे सचिव रामदास जाखोबा वाडेकर यांना संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी (दि. 12) चिंचवड येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त समाजातील विविध गुणिजनांचा श्री स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, समाजगौरव पुरस्कार, आदर्शकार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. आजपर्यंत विविधक्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यंदा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कारासाठी रामदास वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल असे पूरसाकाराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 12) चिंचवड येथील विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ बिजलीनगर येथे संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.