Nana Patekar : चाहत्याला टपली मारल्याच्या प्रकरणावरुन नाना पाटेकरांचा नेटक-यांनी घेतला खरपूस समाचार

एमपीसी न्यूज – नाना पाटेकरांनी एका चाहत्याला टपली (Nana Patekar) मारली. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटक-यांनी नाना पाटेकर यांच्याबाबत संताप व्यक्त केला. नाना पाटेकर यांनी त्या व्हिडीओ बाबत आपली बाजू एका व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. नाना म्हणाले, तशा प्रकारचा एक सीन शूट करायला सुरु होता. पण तो शुटींग मधला मुलगा नसून दुसराच तरुण असल्याचे समजले. याबद्दल माफी असावी.’

नाना पाटेकर वाराणसी येथील गंगा नदीच्या घाटावर शुटींग करीत होते. त्यावेळी शुटींग सुरु असलेल्या ठिकाणी एक तरुण आला. त्याने नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी नानांनी त्या तरुणाच्या डोक्यात टपली मारली आणि सेटवरील इतर लोकांनी त्या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर तो तरुण सेटवरून पळून गेला.

Pimpri : शहरातील वर्दळीच्या चौकांचे व रस्त्यांचे होणार सर्वेक्षण  

या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. आजवर आपण गुणी कलाकार म्हणून ओळखत असलेल्या नानांनी अशा प्रकारे चाहत्याला मारहाण करावी, हे काही नानांच्या चाहत्यांना पटले नाही. नेटक-यांनी यावरून नानांचा खरपूस समाचार घेतला.

याबाबत नाना पाटेकर यांनी त्यांची बाजू मांडली आहे. नाना म्हणाले, “एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात मी एका तरुणाला मारले आहे. पण हा शुटींगचा भाग आहे. आम्ही शुटींगचा सराव करीत होतो. त्यात एक तरुण मला म्हणतो, ए बुढाऊ टोपी बेचनी है क्या. त्यावेळी मी त्याला मारतो आणि समज देतो.

या सीनचा सराव सुरु असताना एक तरुण आला. मला वाटले तो शुटींगमधील एक पात्र असेल. त्यामुळे मी त्याला मारले आणि सीनमध्ये ठरल्या प्रमाणे समज देखील दिली. पण हे नंतर समजले की, तो शुटींगचा भाग नव्हता. नंतर त्या तरुणाला शोधण्यचा प्रयत्न केला. तोपर्यंत तो पळून गेला होता. गैरसमज झाल्याबद्दल माफी असावी.

दरम्यान, डोक्यात टपली खाल्लेल्या तरुणाची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. माझे नाव राज सुनकर आहे. मी बनारस मधील तुलसीपूर येथे राहतो. मी अंघोळ करण्यासाठी गेलो असता माझी नजर शुटींगच्या ठिकाणी पडली. तिथे नाना पाटेकर होते.

मी त्यांचा चाहता असल्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गेलो. पण त्यांनी फोटो काढण्यास नकार दिला आणि मला मारून तिथून पळवलं. मला सिनेमात कोणतीही भूमिका मिळाली नाही. या घटनेनंतर माझी माझ्या एरियात बदनामी (Nana Patekar) झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.