Pune : नाविन्याचा शोध आणि बदलांचा सातत्याने स्वीकार ही मारुती पाटील यांची वैशिष्ट्ये – नाना पाटेकर 

एमपीसी न्यूज – अवहेलना, अपमान, विवंचना वाट्याला ( Pune ) आल्या. भयानक अपघातात एक पाय गमवावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीने जे शिकवले, त्यातून मारुती पाटील यांच्या चित्रांना विषय सापडले, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रकार नाना पाटेकर यांनी शुक्रवारी केले. नाविन्याचा शोध आणि बदलांचा सातत्याने स्वीकार ही पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत, असेही ते म्हणाले.

जेष्ठ चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य मारुती पाटील लिखित आणि राजहंस प्रकाशन प्रकाशित ‘रंग रेषांचे सोबती’ या सचित्र मराठी व इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. लॉ कॉलेज रस्त्यावरील भांडारकर इन्स्टिट्यूट मधील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार- साहित्यिक विजय कुवळेकर, ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर, मारुती पाटील, त्यांच्या मुली बरखा आणि तेजस पाटील याबरोबरच मारुती पाटील यांचा विद्यार्थी परिवार आदी उपस्थित होते.

WorldCup 2023 : आज खेळला जाणार भारत पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना

‘परिस्थिती जे शिकवते, ते कोणी शिकवू शकत ( Pune ) नाही. अपघातामुळे विवंचना, अपमान, अवहेलना वाट्याला आल्यामुळे मारुती पाटील यांनी वेगळे चित्रविषय हाताळले. बदलत्या काळानुसार स्वतः बदलणे आणि सतत नाविन्याचा शोध गरजेचा ठरतो.‌ तो पाटील यांनी घेतला.‌ आपले व्यक्त होण्याचे नेमके माध्यम त्यांनी रंगरेषांतून निवडले. मी ते अभिनयातून निवडले, असे पाटेकर म्हणाले.

रसिकांनी संवाद साधताना पाटील म्हणाले, “मी माझा जीवनप्रवास मांडला आहे. जे वाट्याला आले, त्याची खंत नाही. मी स्वीकार करत गेलो. आनंद घेत देत गेलो. माझ्या वाटचालीत गुरू कुलकर्णी सर, पत्नी, कुटुंबातील सदस्य, माझे सहाध्यायी, विद्यार्थी आणि कला रसिकांचे महत्त्वाचे स्थान आहे.

जे जे स्कूल मध्ये स्टडी टूरसाठी जयपूर येथे असताना हवामहल या प्रसिद्ध ( Pune ) वास्तूचे वेगळ्या कोनातून चित्रांकन करायचे होते. पण नेमकी जागा मिळेना. शेवटी जवळच्या पोलिस चौकीत बसून कोन साधला. सुरवातीला अलिप्त वागणाऱ्या पोलिसांनी नंतर माझे चित्र पाहून माझी चांगली बडदास्त ठेवली, अशी आठवण मारुती पाटील यांनी सांगितली.

पाटील यांच्या कन्या बरखा यांनी प्रास्ताविक केले. तेजस पाटील यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. योगेश देशपांडे यांनी पाटील यांच्याशी संवाद ( Pune ) साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.