WorldCup 2023 : आज खेळला जाणार भारत पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना

एमपीसी न्यूज – विश्वचषकातील सर्वात थरारक आणि रोमांचक ( WorldCup 2023 ) असा हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आजपर्यंत विश्वचषकाच्या इतिहासात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये एकदाही पाकिस्तानाने भारताला हरवले नाही. भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान विश्वचषकात 7 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी सातही सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे भारत विश्वचषकातील आपली परंपरा कायम ठेवेल की पाकिस्तान भारताविरुद्ध विश्वचषकात हरण्याची मालिका तोडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Pune : अग्निशमन दलाकडून आगीमधे अडकलेल्या 9 वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका

विश्वचषक 2023 या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे दोघांचाही आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. पाकिस्तानची जमेची बाजू असलेली तेच गोलंदाजी सध्या त्यांचा चिंतेचा विषय बनलेला आहे, कारण जलदगती गोलंदाज शाईन आफ्रिदी याला विश्वचषकात लौकिकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. मागील दोन्ही सामन्यामध्ये 16 षटकांत 103 धावा देत 2 गडी बाद केले आहेत. हॅरिस रौफ चांगल्या लयीत असून त्याला मोईन आली ने चांगली सात दिली आहे.

पाकिस्तानची फिरकी देखील अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरली ( WorldCup 2023 ) आहे. मोहमद नवाज, शादाब खान यांना मधल्या षटकांमध्ये फलंदाजांवर नियंत्रण ठेवता आले नाही. फलंदाजी चा विचार केल्यास इमाम उल हक, फकर जमान आणि कर्णधार बाबर आझम हे फार्मात नसलेले पाहिल्या फळीतील खेळाडू यांनी पाकिस्तानची चिंता वाढविली आहे.

आयसीसी रँकिंग मध्ये क्रमांक 1 वर असलेला कर्णधार बाबर आजम विश्वचषकात दोन्ही सामन्यात केवळ 15 धावा करू शकला. त्यामुळे पाकिस्तानाच्या संघावर मोठे दडपण निर्माण झाले आहे. मधल्या फळीत मोहम्मद रिजवान याने चांगली फलंदाजी केली आहे मोहम्मद नवाज, शादाब खान यांना फलंदाजीत आपली छाप पाडता आली नाही.

Pune : अग्निशमन दलाकडून आगीमधे अडकलेल्या 9 वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका

तर दुसरीकडे भारतीय संघ भक्कम अशा स्थितीत आहे. भारताचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा हा चांगल्या फॉर्म मध्ये असून त्याला मागच्या सामन्यात ईशान किशन ने चांगली साथ दिली. विराट कोहली याने मागील दोन्हीही सामन्यांमध्ये अर्धशतक लगावले आहे. तर मधल्या फळीतील फलंदाज के एल राहुल यांनीही पहिला सामन्यात विजय एक हाती खेचून आणला आहे. श्रेयस अय्यर ने देखील संयमी फलंदाजी केली आहे. या सामन्यांमध्ये शुभमन गिल खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.

भारताच्या वतीने उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनीही प्रभावी कामगिरी केली. तर जसप्रीत बुमरा हा आपल्या लयीत असून आतापर्यंत त्याने संघासाठी चांगले योगदान दिले आहे. कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन हे दोघेही चांगली गोलंदाजी करत असून आज या सामन्यात दोघांपैकी कोणाला संधी मिळेल ते पाहणे गरजेचे आहे.

तथापि, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला आपल्या गोलंदाजीची छाप पाडता आली नाही या सामन्यांमध्ये त्याच्या ऐवजी मोहम्मद शमी याला संधी मिळण्याच्या जास्त शक्यता आहेत. भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी भक्कम आहे. तर पाकिस्तानची फलंदाज आणि गोलंदाज प्रभावी खेळी करण्यासाठी झगडत आहेत.

त्यामुळे अहमदाबाद येथे खेळला जाणारा सामना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल हे पाहण्यासाठी अहमदाबाद येथे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक जमा झाले आहेत. तेथील हॉटेल्स आणि लॉज मध्ये राहण्यासाठी रूम्स मिळत नाहीत. वेगवेगळ्या शहरांमधून अहमदाबाद येथे जाण्यासाठी प्रवाशांना वाहतुकीची सोय करण्यात आलेली आहे . तसेच या क्षेत्राला ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

हा सामना दुपारी 2.00 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. तसेच स्टार स्पोर्ट वाहिन्यांवर देखील सामन्यांचे प्रक्षेपण ( WorldCup 2023 ) होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.