Pune : अग्निशमन दलाकडून आगीमधे अडकलेल्या 9 वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज – इमारतीत आग लागल्यानंतर खिडकीच्या ( Pune ) ग्रिलमध्ये अडकलेल्या एका 9 वर्षीय मुलीची अग्निशामक दलाने सुखरूप सुटका केली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.13) मध्यरात्री कात्रज येथील भरती विद्यापीठ परिसरातील नॅन्सी लेक होम या इमारतीत घडली आहे.
राजलक्ष्मी दिलिप सुकरे – (वय 9) असे सुटका करण्यात ( Pune )आलेल्या मुलीचे नाव आहे. नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून अग्निशमन मुख्यालय अग्निशमनवाहन व एक रेस्क्यु व्हॅन, काञज, गंगाधाम, कोंढवा बुद्रुक येथून एकुण 4 वाहने रवाना करण्यात आली.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी 11 मजली इमारतीत  असून त्यातील दुसरया मजल्यावर सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागली होती. जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व त्याचवेळी घरामधे कोणी अडकले आहे का याची खाञी करीत असताना राजलक्ष्मी हि खिडकीमधील लोखंडी ग्रिलमधे अडकल्याचे दिसले.

ती वाचवण्याकरिता आरडाओरडा करीत होती. त्याचवेळी जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन बी ए सेट तसेच हायड्रोलिक कटर, कटावणी, रश्शीचा वापर करत खिडकीजवळ शिडी लावून त्याचवेळी काही जवानांनी शेजारील सदनिकेच्या गच्चीवरुन मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.
अवघ्या पाच ते दहा मिनिटात जवानांच्या प्रयत्नाला यश येऊन आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. तसेच आग वीस मिनिटात नियंञणात आली. घराचे मोठे नुकसान झाले असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे.
हि कामगिरीत दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर, वाहन चालक येरफुले, अतुल मोहीते, तांडेल मंगेश मिळवणे व जवान रामदास शिंदे, तेजस मांडवकर, चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, लक्ष्मण घवाळी, दिगंबर बांदिवडेकर, तेजस खरीवले, अर्जुन  यादव, अभिजित थळकर ( Pune ) यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.