Pune : कोथरूड परिसरात सुरक्षारक्षक व रहिवाश्यांवर हल्ला करत चोरट्यांनी पळवली चंदनाची झाडे

एमपीसी न्यूज – कोथरूड परिसरातील दोन रहिवासी सोसायट्यांमधील (Pune) सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांवर चोरट्यांनी गोफणीने हल्ला करत घटनास्थळावरील चंदनाची झाडे चोरून पलायन केले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन सुरक्षारक्षक आणि काही रहिवासी जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कोथरूड येथील वुडलँड सोसायटीच्या आवारात गुरुवारी पहाटे 2.45 च्या सुमारास चार  चोरटे चंदनाची झाडे चोरून नेत असताना सुरक्षा रक्षक कृष्णा जोगदंड (21) यांनी  पाहिले . त्यांनी  चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी जोगदंड आणि त्यांच्या सुरक्षा केबिनवर गोफणीचे अनेक गोळे फेकले. गोफणीच्या हल्ल्यात जोगदंड जखमी झाले .

दरम्यान, चोरट्यांनी सोसायटीतील 10 हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड तोडून ते घेऊन (Pune)  पलायन केले. याप्रकरणी जोगदंड यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Worldcup 2023 : न्यूझीलंडचा सलग तिसरा विजय; बांगलादेशवर 8 गड्यांनी मात

अशाच एका घटनेत बुधवारी रात्री चंदन चोरांच्या टोळक्याने कोथरूड येथील श्रीनिवास गार्डन सोसायटीच्या आवारातील चंदनाची झाडे तोडताना पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांनी अलार्म लावला. मात्र चोरट्यांनी सोसायटीच्या गेटजवळ गार्डला कोंडून ठेवत रहिवाशांवर गोफणीने हल्ला केला. या घटनेत सुरक्षारक्षक आणि काही रहिवासी जखमी झाले. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकाच गटाचा चंदन चोरांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिस तपास करण्याचा प्रयत्न करत (Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.