Worldcup 2023 : न्यूझीलंडचा सलग तिसरा विजय; बांगलादेशवर 8 गड्यांनी मात

एमपीसी न्यूज -लाॅकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री यांची ( Worldcup 2023 ) भेदक गोलंदाजी आणि कर्णधार केन विल्यमसन आणि डेरेल मीचल यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशला 8 गडी राखून सहज मात दिली.

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळलेल्या सामन्यात नाणेफेक न्यूझीलंडने जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास हा सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ( Worldcup 2023 ) झेलबाद झाला. तांजीत हसन 16 धावा, मेहदी मिराज 30 धावा आणि शांतो 7 धावा  हे खेळाडू झटपट बाद झाल्याने बांगलादेशवर दबाव निर्माण झाला.

त्यांची 12 षटकात 4 बाद 56 धावा अशी अवस्था झाली.  यावेळी कर्णधार शाकिब अल हसन आणि  मुशफिकर रहीम यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी रचली,  लाॅकी फर्ग्युसन याला फटका मारण्याचा नादात शाकीब 40 धावांवर झेलबाद झाला. थोड्याच वेळाने अर्धशतकी खेळी करणारा मुशफिकर रहीम  66 धावांवर  त्रिफळाचीत झाला. शेवटच्या षटकांमध्ये अनुभवी खेळाडू महमदुल्ला याने 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाला 245 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

Manipur Massacre : मणिपूर हत्याकांड प्रकरणी सीबीआयकडून पुण्यातून एकाला अटक

यावेळी न्यूझीलंडच्या लाॅकी  फर्ग्युसन, याने भेदक गोलंदाजी करत 3 बळी घेतले, तर  ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री  यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 246 धावांचे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले.सलामी फलंदाज सचिन रवींद्र 9 धावा लवकरच बाद झाल्याने बांगलादेशी गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला.

त्यानंतर न्यूझीलंडने संयमी फलंदाजी केली, कर्णधार केन विल्यम्सन 78  धावा डेविन कॉन्वे 45 धावा  यांनी दुसऱ्या गड्यांसाठी  80 धावांची भागीदारी केली  कॉन्वे 45 धावा काढून  बाद झाला.  त्यानंतर आलेल्या डेरेल मीचल याने 89 धावांची अभेद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. बांगलादेशी गोलंदाजांना विकेट्स घेता आल्या नाहीत आणि न्यूझीलंडने  विश्वचषकातला ( Worldcup 2023 ) सलग तिसरा विजय मिळवला न्यूझीलंडने  246 धावांचे लक्ष्य 42. 5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. सामनावीर लाॅकी फर्ग्युसन ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.