Manipur Massacre : मणिपूर हत्याकांड प्रकरणी सीबीआयकडून पुण्यातून एकाला अटक

एमपीसी न्यूज -मणिपूरमधील दोन तरुणांचे अपहरण करत (Manipur Massacre) हत्या केल्या प्रकरणी सीबीआयने शुक्रवारी मोठी कारवाई केली. केंद्रीय अन्वेषण विभागाने पुण्यातील एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपींना सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Kelgaon : आळंदीजवळ केळगाव परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मणिपूर हत्याकांड प्रकरणी सीबीआयकडून गेल्या काही दिवसांपासून आरोपींचा शोध सुरु होता. या प्रकरणातील आरोपींनी मणिपूरमधील 17 वर्षीय विद्यार्थी हिजाम लिनथोइंगंबी आणि 20 वर्षांचा फिजाम हेमजीत यांचे अपहरण केले होते. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी त्यांची हत्या झाल्याचा व्हिडिओ समोर आला.

या प्रकरणी सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर चार आरोपींना अटक केली होती. पाओमिनलुन हाओकिप, एस. मालस्वान हाओकिप आणि दोन महिला लिंग्नेइचोन बैतेकुकी आणि टिननेइलिंग हेन्थांग यांना एक ऑक्टोंबर रोजी अटक केली होती. परंतु यातील आणखी एक संशयीत आरोपी फरार होता.

तो पुण्यात लपून बसल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. 11 ऑक्टोबर रोजी या संशयीत आरोपीला अटक करण्यात आली.पावलून मँग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पावलून मँग हा या प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय आहे. त्याला 16 ऑक्टोबर पर्यंत सीबीआयची कोठडी देण्यात आली (Manipur Massacre)  आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.