Nashik News : पदोन्नती आणि 516 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा – सभापती गिते

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा कालावधी संपूनही मुदतवाढ न दिलेल्या 43 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 516 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर तातडीने भरती करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले.

सोबतच पालिकेतील नियमित अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची प्रक्रिया देण्यात विलंब होत असल्याने प्रशासन उपायुक्त मनोज घोडे – पाटील यांना जाब विचारल्यानंतर सभापती गणेश गिते यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे अहवाल ठेवावा व 15 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या.

_MPC_DIR_MPU_II

स्थायी समितीच्या सभेत राष्ट्रवादीच्या समिना मेमन यांनी जुन्या नाशकातील मुलतानपुरा दवाखान्यात व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचा आरोप केला. सुप्रिया खोडे यांनी देखिल हाच मुद्दा उपस्थित करत वडाळागावातील पालिका दवाखान्याचे उदाहरण त्यांनी दिले. त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी पालिका रुग्णालयांची सद्यस्थिती कथन केली यात त्यांनी 1477 वैद्यकीय कर्मचारी कार्यरत असल्याकडे लक्ष वेधले.

सभापती गितेंनी पालिका रुग्णालये, दवाखाने आणि प्रसूतिगृहात चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी 516 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. यामध्ये, 43 वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन वर्षे तर अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सहा महिने मानधनावर नियुक्ती केली जाईल, असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.