Nashik News : रुग्णालयांसाठी ऑक्सिजन टाक्यांची निविदा रद्द

मविप्र रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाक्या ताब्यात घेण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या रुग्णालयांसाठी थेट ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश आणि त्यासोबतच ठेकेदाराकडून भाडेतत्वावर ऑक्सिजन टाक्या बसविण्याची निविदा प्रक्रिया झालेल्या स्थायी समितीच्या सभेत रद्द करण्याचे आदेश सभापती गणेश गिते यांनी दिले. मविप्र रुग्णालयाला देण्यात आलेल्या ऑक्सिजन टाक्या ताब्यात घेवून पंचवटीतील दोन रुग्णालयाकरिता त्यांचा वापर करण्याच्या सूचनादेखील गिते यांनी दिल्या आहेत.

शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत सभापती गणेश गिते यांनी आदेश दिले. रुग्णालयांसाठी थेट ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश सभापती गणेश गिते यांनी यावेळी दिले. तसेच मविप्र रुग्णालयाला देण्यात आलेल्या दोन्ही ऑक्सिजन टाक्या ताब्यात घेवून पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय व सिडकोतील मोरवाडी रुग्णालयाकरिता त्यांचा वापर करण्याच्या सूचनादेखील गिते यांनी दिल्या .

स्थायी समितीच्या सलग दुसऱ्या सभेत समिती सदस्य राहुल दिवे यांनी महापालिकेच्या माध्यमातून नाशिकरोड येथील बिटको व जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात भाडेतत्वावर बसविण्यात येत असलेल्या ऑक्सिजन टाक्यांच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला. त्यावर सभापतींनी चर्चा करून आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.