Nashik News: जसपालसिंग बिर्दी जयंतीनिमित्त सायकल फेरी, गरजूंना सायकल वाटप व धान्यदान उपक्रम

एमपीसी न्यूज – नाशिक शहरातील सायकल चळवळ व्यापक होण्यासाठी मोलाचे योगदान दिलेल्या ‘नाशिक सायकलिस्ट’चे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी  यांच्या जयंतीनिमित्त शहरात सायकल फेरी, गरजूंना सायकल वाटप तसेच धान्यदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गोल क्लब मैदान येथून नगरसेविका स्वाती भामरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल फेरीची सुरुवात करण्यात आली. गोल्फ क्लब- मायको सर्कल – एबीबी सर्कल – सिटी सेंटर मॉल – इंदिरा नगर – साईनाथ नगर असा मार्ग होता.

नाशिक  मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या निधीतून नव्याने साकारण्यात आलेल्या जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅक येथे या सायकल फेरीची सांगता झाली. या सायकल ट्रॅकवर सर्व सायकलिस्टने सायकलिंग करत प्रत्यक्षात ट्रॅकची पाहणी केली. जसपालसिंग बिर्दी यांच्या स्मृतीस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले .

या कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, महिला आयोगाच्या प्रमुख रोहिणी नायडू, जसपालजींचे वडील कुलदीपसिंग बिर्दी, रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन, मुकेश ओबेराॅय , नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, श्रीकांत जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना सायकल वाटप, धान्यदान हा उपक्रम राबविण्यात आला.

त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी भागात  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्यात आल्या. तसेच शहरातील काही गरजू मुलींना देखील  सायकल देण्यात आल्या.

जयश्री झोले, मालती वाघ, पूजा शिवरे, मंगल मेंगल, वनिता सराई, सोनाली साटोटे,  नुपुर मोरे, ऋतुजा घोणे, आरती खंदारे या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकल सुपूर्द केल्या. त्यांच्या निरागस चेहऱ्या यानिमित्ताने फुलवण्याचा प्रयत्न नाशिक सायकलिस्टच्या दानशूर सदस्यांमार्फत करण्याचा प्रयत्न केला.

पाच सुरक्षारक्षकांना  देखील कामावर जाण्यासाठी सायकल वाटप केले. श्याम रजक, आर व्ही रजक,. विनोद शर्मा, चंदू आहेर,  रघुनाथ नागरे अशी या सुरक्षारक्षकांची नावे आहेत.

आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते 300 किलो धान्यदान करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, यांच्याद्वारे वनवासी दुर्गम भागात वाटप करण्यासाठी हे धान्य सुपूर्त केले. तसेच रॉबिनहूड आर्मी हे लग्नसमारंभातील उरलेलं अन्न वाया जाऊ न देता ते गरजू पर्यंत पोहोचवतात त्यांच्याकडे सुपूर्त केले.

जसपालसिंग बिर्दी यांच्या जयंतीनिमित्त सर्व सायकलपटूंनी आरोग्य कवच विमा पॉलिसी काढून घेण्याचे आवाहन ‘नाशिक सायकलिस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे  यांनी केले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या डिजिटल कार्डचे अनावरण देवयानीताई यांच्या हस्ते करण्यात आले. या वेबसाईटमुळे सर्व माहिती व उपक्रम सर्व सभासदांपर्यंत व  इतर सायकलपटूंपर्यंत सहजरित्या पोहोचेल.

नाशिक  शहराला सायकल कॅपिटल बनवण्याचे  स्वप्न जसपालजींचे  होते. या दृष्टीने त्यांच्या स्मरणार्थ साईनाथनगर येथील सायकल ट्रॅकची निर्मिती करण्याचे काम देवयानीताई यांनी हाती घेतले व लवकरच या ट्रॅकचे लोकार्पण होणार आहे .

जसपालजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाचीच वैयक्तिक जबाबदारी आहे, या हेतूने यापुढे आपल्याला शहरात अनेक बदल घडून आणायचे आहे, असे मत देवयानी ताई यांनी मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक सायकलिस्टच्या सचिव डॉ. मनिषा रौंदळ यांनी केले. आभार प्रदर्शन खजिनदार रवींद्र दुसाने यांनी मांडले

सायकल डोनेशनसाठी सर्व सायकलिस्ट मिळून जे योगदान दिले त्यामुळे आज गरजूंपर्यंत  सायकली पोहोचविण्यात आल्या.

या कार्यक्रमाला देविंदर भेला, मोहन देसाई, किशोर माने, सुरेश डोंगरे, नीता नारंग, सोफिया कपाडिया, पल्लवी पवार, प्रशांत भागवत, नितीन कोतकर, वैशाली शेलार, नाना आठवले ,अनिल वराडे, साधना दुसाने, किशोर शिरसाठ, मोहिदरसिंग भारहाज व इतर सायकलिस्ट मोठ्या संख्येने या अभिनव उपक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.