Pimpri corona Update : कोरोनाचा फैलाव मंदावला, शहरात आज 83 नवीन रुग्णांची नोंद

148 जणांना डिस्चार्ज; 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा फैलाव मंदावला आहे. दिवसेंदिवस नवीन रुग्णसंख्येत घट होत आहे. शहराच्या विविध भागातील 81 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 82 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 148 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

महापालिका हद्दीतील दोन आणि हद्दीबाहेरील दोन अशा जार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये चिंचवड येथील 75 वर्षीय महिला, पिंपरीतील 60 वर्षीय महिला, कात्रज येथील 48 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 90 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 99 हजार 29 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 95 हजार 771 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1789 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 749 अशा 2538 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 628 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3019 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.