Nashik News : पुणे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

एमपीसी न्यूज – जिल्‍ह्यातील नांदगाव येथील रहिवाशी आणि सध्‍या पुणे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून कार्यरत असलेले राजेंद्र सरग यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोरोनाच्‍या काळात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल हा सन्‍मान करण्‍यात आला. सरग यांच्याकडे सध्या पुणे विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

पुणे जिल्‍ह्यात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्‍ण सापडला. तथापि, 26 फेब्रुवारीपासूनच प्रशासनाच्‍यावतीने राबविण्‍यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रसारमाध्‍यमांपर्यंत अचूक आणि तात्‍काळ पोहोचवण्‍यात माहिती कार्यालय आघाडीवर होते.

‘लॉकडाऊन’मध्‍ये अधिकृत माहितीसाठी ट्वीटर, फेसबुक, व्‍हॉट्सअप तसेच इ-मेल या माध्‍यमांचा प्रभावी वापर करुन अधिकृत माहिती पोहोचवण्‍यात येत होती. त्‍यामुळे सोशल मीडियावरील अफवांचे निराकरण करण्‍यास मदत झाली. यापूर्वी राजेंद्र सरग यांना आद्य पत्रकार देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार 2020 चा सूर्य गौरव पुरस्‍कार याशिवाय महाराष्‍ट्र शासनाचा यशवंतराव चव्‍हाण उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार, राज्‍यस्‍तरीय चौथा स्‍तंभ व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.