Nigdi: निगडीतील राष्ट्रध्वज शिलाई उसविल्यामुळे उतरविला

वा-याचा वेग आणि वजनामुळे ध्वज काढावा लागतोय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीवर उभारलेल्या राष्ट्रध्वजाचे धागे ओढले गेले असून शिलाई उसवली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हा ध्वज उतरविण्यात आला आहे. या ध्वजाचे वजन 80 किलो आहे. वा-याचा वेग आणि वजनामुळे वारंवार ध्वज काढण्याची वेळ येत आहे. वा-याचा फटका बसला की शिलाई उसविली जात आहे. शिलाई बसवून आणली असून उद्या (शुक्रवारी) ध्वजारोहण करण्यात येणार असल्याचे पालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांनी सांगितले.

पिंपरी पालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक उंची असलेला दोन नंबरचा हा ध्वज आहे. प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारीला ध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. या राष्ट्रध्वजाचे कापड 120×80 असून वजन 80 किलो आहे. त्यामुळे वा-याचा वेग वाढला की ध्वजाची शिलाई उसविली जाते. शिलाई उसवल्यामुळे आजपर्यंत चार वेळा ध्वज उतरविण्यात आला होता.

कार्यकारी अभियंता सतीश इंगळे म्हणाले, ”या राष्ट्रध्वजाचे धागे ओडले गेले असून शिलाई उसवली होती. त्यामुळे ध्वज उतरविण्यात आला होता. ध्वज दुरुस्त करुन आणला आहे. उद्या (शुक्रवारी) ध्वजारोहण केले जाणार आहे. ध्वज मजबूत देण्याची मागणी आम्ही एजन्सीकडे केली आहे. देशात केवळ दोनच एजन्सीला ध्वज बनविण्याची परवानगी आहे. निगडीतील ध्वज मुंबईतील फ्लॅग इंडिया या एजन्सीकडून बनविला होता. त्यांच्याकडे ध्वजाची डिझाईन बदलून मजबूत बनवून देण्याची विनंती केली आहे. या ध्वजाचे तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे बजाज कंपनीचे लोक ध्वजाची देखभाल करत आहेत”

"Sammelan"

"Sammelan

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.