Pune : पुणे स्टेशन ते ढोले पाटील कॉलेज बस सेवेचे सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – नागरिकांची सोय व अनेक वर्षांची मागणी लक्षात घेत पुणे स्टेशन ते ढोले पाटील कॉलेज बस सेवा पुणे परिवहन महामंडळाच्या वतीने नुकतीच सुरु करण्यात आली असून पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते आज या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. माजी महापौर उल्हास ढोलेपाटील, माजी आमदार कमलताई ढोलेपाटील, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे संचालक सागर ढोलेपाटील, आमदार जगदीश मुळीक, हवेलीचे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिक्षक सुहास गरुड, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका संजिला पठारे, सुमन पठारे, डॉ. राजेंद्र हिरेमठ, भैयासाहेब जाधव हे देखील यावेळी उपस्थित होते.       

खराडी, चंदननगर आणि वडगाव यांसारख्या उपनगराच्या भागातून शहरात येणा-या पीएमपी प्रवाश्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. खराडी येथे झालेल्या आयटी पार्कमुळे या संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. हेच लक्षात घेत या भागांमधून पुणे स्टेशन परिसरात थेट बससेवा असावी ही नागरिकांची मागणी होती. हेच लक्षात पीएमपीएमच्या वतीने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे खराडी, चंदननगर व वडगावशेरी भागातील नागरिकांची प्रवासाची सोय होईल व प्रवासाचा वेळ देखील वाचेल असा विश्वास सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.