Pimpri : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार मार्च 2012 पासून ऑक्टोबर 2018 या कालावधीत पिंपरी गाव वाघेरे कॉलनी येथे घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा वाघेरे कॉलनी, पिंपरी मधील तरुणाशी 18 मार्च 2012 रोजी विवाह झाला. विवाहानंतर कसाबसा एक महिना सुखाचा संसार झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी महिलेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने यासाठी नकार दिला. त्यामुळे सासरच्या मंडळींनी आणखी छळ केला. 5 जुलै 2014 रोजी सासरच्या लोकांनी विवाहितेला माहेरहून पैसे न आणल्यामुळे घरातून हाकलून दिले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून विवाहित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.