NCP : महिलांना सामान्य करात 50 टक्के सवलत देण्याची राष्ट्रवादीची कॉंग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज : महिलांना सामान्य करात 50 टक्के सवलत देण्याची (NCP) मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. महिलांना पूर्वीप्रमाणे 50 टक्के सवलत न दिल्यास राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात अजित गव्हाणे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

WTC FINAL – सामना रंगतदार अवस्थेत; तर अजिंक्य रहाणेचे संघात 16 महिन्यांनी दिमाखात पुनरागमन

या निवेदनात गव्हाणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य करात महिलांना 50 टक्के सवलत होती, परंतु प्रशासनाच्या मनमानी कारभाराने ती 30 टक्के केलेली आहे. एकीकडे (NCP) सरकार महिलांच्या सबलीकरणाचा विचार करत आहे तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिलांना सवलतीपासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे. या घटनेचा निषेधही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवडच्यावतीने केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.