Pimpri News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवरील आयकर विभागाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कार्यालयात आणि घरी केंद्रीय आयकर विभाग सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शुक्रवारी)  कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केले. केंद्र सरकारने केलेली ही कारवाई हेतुपुरस्सर असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तसेच केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल,  वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,  नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पोर्णिमा सोनवणे, संगीता ताह्मणे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, काळूराम पवार, राजेंद्र साळुंखे, प्रसाद शेट्टी, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सारिका पवार, कविता खराडे, गंगा धेंडे आदी कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले आहेत.  “आम्ही सदैव अजितदादांसोबत”, wee support ajit dada, “आमची ताकद, आमचा अभिमान अजितदादा” असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. हाताला काळी फित बांधली होती.

 

 

 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधीत कारखाने, त्यांच्या तीन बहिणी यांच्या घरी, कार्यालयावर काल सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावरही छापा टाकला. ही कारवाई अद्यापही सुरू असल्याचे सांगण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.