Ganesh Mhalaskar : वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे गणेश म्हाळसकर

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश सोपानराव म्हाळसकर यांची वडगाव नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुनील ढोरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने नगरपंचायतच्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी गणेश म्हाळसकर यांची निवड जाहीर केली.

 

CSK Ice Squash Trophy : कमलेश ढमढोरे, आर्यमन सिंग, गार्गी कदम, लक्ष्मी लछका, व्ह्योमिका खंडेलवाल, क्रिया सरवानन यांचे संघर्षपूर्ण विजय

 

नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष पुनम जाधव, गटनेते राजेंद्र कुडे,प्रमिला बाफना, दिनेश ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्ष ढोरे यांनी म्हाळसकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे घोषित केले.
सभेस नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर,दिलीप म्हाळसकर,भूषण मुथा, शारदा ढोरे, पुजा वहिले, माया चव्हाण, सायली म्हाळसकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.