Daund : भीमा नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश

एमपीसी न्यूज – भीमा नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. आज दुपारी पावणे तीन वाजता तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

निखिल होलम असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

निखिल हा सोमवारी संध्याकाळी मलथन गावाजवळील भीमा नदीत बुडाला. त्यानंतर पुण्याच्या एनडीआरएफच्या जवानांनी त्याचा मृतदेह शोधण्याची मोहीम राबविली. अखेर आज निखिलचा मृतदेह शोधण्यात जवानांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.